Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मजदूर महिलेच्या जनधन खात्यात 99 कोटी रुपये

मजदूर महिलेच्या जनधन खात्यात 99 कोटी रुपये
उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका महिलेच्या जनधन खात्यात अचानक 99 कोटी रुपये जमा करण्यात आले. यामुळे तिच्या कुटुंबाची झोप उडाली आहे. महिलेने बँकेत तक्रार केली आहे की हा पैसा तिचा नाही परंतू आतापर्यंत कारवाई झालेली नाही. महिलेच्या पतीने पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली आहे.
 
शीतल नावाची महिला मेरठच्या एका फॅक्टरीत केवळ पाच हजार रुपये दर महा पगारावर नोकरी करते. शीतलचा नवरा जिलेदार सिंग यादव हा एका कंपनीत साधारण नोकरीत आहे. 18 डिसेंबरला शीतल आपल्या खात्याची चौकशी करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या एटिएमवर गेली. खात्याच्या रसीद काढली तर होश गमावले. त्यावर 99 कोटी 99 लाख 99 हजार 394 रुपये लिहिलेले होते.
 
शीतल आणि तिच्या नवर्‍याने एसबीआय शारदा रोड येथे तक्रार केली परंतू बँकेकडून योग्य कारवाई केली गेली नाही. नंतर शीतल ने पंतप्रधान मोदींना ईमेल पाठवून मदत मागितली.
 
शीतलने 2015 साली ब्रह्मपुरी स्थित सहायक केंद्रच्या माध्यमाने एसबीआयच्या शारदा रोड शाखेत जनधन खाते उघडले होते. आता प्रश्न हा उद्भवत आहे की शीतलच्या जनधन खात्याचा वापर ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी तर होत नाहीये.
 
उल्लेखनीय आहे की यापूर्वीही अग्राच्या मंडी समितीजवळ सुमित नगरमध्ये राहणार्‍या ओंकार प्रसाद तिवारीच्या मुलगा संदीपच्या खात्यात 99 कोटी रुपये जमा झाले होते. त्याच्या खात्यात जेव्हा 99,99,91,723.36 रुपये जमा झाले तेव्हा एटिएमची रसीद बघून त्याची ही झोप उडाली होती कारण त्याच्या खात्यात केवळ 8 हजार रुपये होते.
 
याच प्रकारे सुंदरवल येथे न्हावी दिलशादच्या खात्यातही 99 कोटी 99 लाख रुपये जमा झाल्याचा मेसेज त्याच्या मोबाइलवर आला होता. एका महिला कांस्टेबलनेही अशी ‍तक्रार नोंदवली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केरळच्या तीन कंपन्यांकडे आहे बर्‍याच श्रीमंत देशांपेक्षा जास्त सोने