मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास भटक्या कुत्र्यांनी दोन वर्षाच्या मुलीचा जीव आहे आहे
मध्यप्रदेशमधील खरगोन जिल्ह्यात एक निर्माण स्थळावर एक कुटुंब सध्या वास्तव करीत आहे. या मुलीचे वडील इथे सुरक्षा रक्षकाचे काम पाहतात. सोमवारी रात्री या चिमुकलीचे वडील जेवण बनत होते तर आई अंघोळ करीत होती.
मिळालेल्या माहितीनुसार ही चिमुकली खेळता खेळता बाहेर आली. वर तिच्यावर परिसरातील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला व तिचे लचके तोडले. तसेच या चिमुकलीला हे कुत्रे 100 ते 150 मीटर ओढत घेऊन गेले. या मुलीच्या आवाजाने तिचे आई-वडील बाहेर आले व कसे बसे या चिमुकलीला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. तसेच तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेले असाता चिकिस्तकांनी तिला मृत घोषित केले. तिच्या आई वडिलांनी एकच हंबरडा फोडला.
जिल्हा रुग्णाल्याचे सिव्हिल सर्जन यांनी सांगितले की, या कुत्र्यांनी चावल्यामुळे या चिमुकलीच्या छातीवर आणि कमरेवर खोल जखमा झाल्यामुळे यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. सध्या देशामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वीकडे परिसरात नागरिकांमध्ये कुत्र्यांची भीती निर्माण झाली आहे.