Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशात लवकरच दिसणार हवेत उडणारी बस- नितीन गडकरी

देशात लवकरच दिसणार हवेत उडणारी बस- नितीन गडकरी
, शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (10:51 IST)
आता पर्यंत आपण केवळ चित्रपटाचं हवेत उडणारी बस पाहत होतो. पण आता हे काही वर्षातच पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे. सध्या जगभरात उडणाऱ्या कारचे प्रयोग सुरु आहे. उडत्या कारसाठी काही देशात परवानगी देखील देण्यात आली आहे. आता भारतात उडणारी बस लवकरच येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आपण आतापर्यंत चित्रपटात उडणाऱ्या वाहनाचे दृश्य आता प्रत्यक्षात पाहता येणार. 
 
 केबल वरून चालणाऱ्या हवेत उडणाऱ्या बसचे पहिले प्रयोग प्रयागराज मधून केले जाणार आहे.  ज्या प्रमाणे रोपवे ने ट्रॉली सरकते त्याच प्रमाणे एका जाडजूड केबल वरून ही बस पुढे जाईल. या बस ची क्षमता 15 ते 20 प्रवाशी घेऊन जाण्याची असून  या बस चे स्थानक मोठ्या मोठ्या खांबावर बांधले जाणार. ही बस हवेतून जाणार असल्याने वाहतूक नियंत्रण चा त्रास कायमचा दूर होईल असे देखील सांगितले आहे. प्रयागराज मधून हवेत चालणाऱ्या या बस कडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धावत्या ट्रेन मधून उतरणे जीवावर बेतले,रेल्वेची धडक लागून मृत्यू