Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पत्त्यांसारखी कोसळली मोठी इमारत

दिल्ली , मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (15:05 IST)
देशाची राजधानी दिल्लीत चार मजली इमारत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही ही चांगली बाब आहे. इमारत कोसळण्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ही इमारत स्थानिक बिल्डरने बांधली होती, जी एमसीडीने धोकादायक घोषित केली होती.
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण आज सकाळी उत्तर दिल्लीतील शास्त्रीनगर भागातील आहे. सकाळ असल्याने फार कमी लोक घराबाहेर पडले. रस्त्यावर काही लोक उपस्थित होते. त्या लोकांना चार मजली इमारतीत काही हालचाल दिसली तेव्हा ते दूर जाऊ लागले. तर काही लोक मोबाईलवरून व्हिडिओ बनवू लागले.
 
सोमवारी सकाळी दिल्लीतील शास्त्रीनगर भागात ही घटना घडली. सहा महिन्यांपूर्वी एमसीडीने ही इमारत धोकादायक घोषित केली होती, मात्र हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने इमारत पाडता आली नाही. इमारत कोसळल्यामुळे आजूबाजूच्या अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. एका बांधकामाधीन इमारतीचेही नुकसान झाले आहे.
Edited by : Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मालिका पाहून मुलीने रचला स्वत:च्या हत्येचा कट