Wayanad News : केरळमधील वायनाडमध्ये एक नरभक्षक वाघ मृतावस्थेत आढळला. पोस्टमोर्टम करतांना पोटात महिलेचे केस, कपडे आणि कानातले आढळले, ज्यामुळे हे स्पष्ट झाले की हा तोच वाघ आहे ज्याचा शोध घेतला जात होता.
काही दिवसांपूर्वी जंगलाजवळ कॉफीचे दाणे गोळा करण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला केला होता. या मादी वाघिणीचे वय चार ते पाच वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी, वन्यजीव कर्मचाऱ्यांच्या एका पथकाला तो पिलाकावू येथील एका घरामागे मृत अवस्थेत आढळला. वाघाचे शवविच्छेदन केल्यानंतर, वन अधिकाऱ्यांनी सांगितले की वाघाच्या मानेवर ताजे आणि खोल जखमा आढळून आल्या आहे, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितले की, जंगलात दुसऱ्या वाघाशी झालेल्या लढाईत या जखमा झाल्या असा विश्वास आहे. शनिवारी पंचकोली भागात राधा नावाच्या महिलेला मारणारा हाच वाघ होता, याची अधिकाऱ्यांनी पुष्टी केली.
Edited By- Dhanashri Naik