गुजरातमधील सुरत शहरातील पाल भागात शनिवारी दुपारी एक सहा मजली निवासी इमारत कोसळली. या अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंग गेहलोत यांनी सांगितले की, इमारत कोसळल्यानंतर एका महिलेला ताबडतोब सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर रात्रभर चाललेल्या बचाव कार्यात सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ही घटना दुपारी 2.45 च्या सुमारास घडली.
व्हा ही दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत राहणारे बरेच लोक कामावर गेले होते आणि रात्रीच्या शिफ्टनंतर बरेच लोक इमारतीत झोपले होते. ते म्हणाले की, बचावकार्य 12 तासांहून अधिक काळ सुरू आहे. अजूनही आम्ही ढिगारा हटवण्याचे काम करत आहोत. अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली दबले असण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
2016-17 मध्ये इमारतीचे बांधकाम पाच फ्लॅटमध्ये झाले होते . येथे सुमारे पाच फ्लॅटमध्ये लोक राहत होते. यातील बहुसंख्य या भागातील कारखान्यांमध्ये काम करणारे लोक होते. जेव्हा बचावकार्य सुरू झाले तेव्हा आम्हाला अडकलेल्या लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. आम्ही एका महिलेला ढिगाऱ्यातून बाहेर काढले आणि तिला रुग्णालयात नेले. त्यानंतर एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर रात्रभर आणखी सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले.
याप्रकरणी स्थानिकांनी सांगितले की, ही इमारत अतिशय जीर्ण झाली असून, प्रशासनाने ती खाली करण्याची नोटीसही दिली होती, मात्र त्यानंतरही लोक राहत होते. अपघातानंतर स्थानिक लोकांनी काही जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस आणि इतर पथके बचावकार्य करत आहेत.