वेळेवर न आल्याची शिक्षा म्हणून शाळा प्रशासनाने टॉयलेट साफ करण्यास सांगितल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. वृत्तानुसार, स्वयंपाकी विजयालक्ष्मी म्हणाली, 'मी शाळेत असताना, विद्यार्थी शौचालय स्वच्छ करण्यासाठी बादल्या आणि झाडू घेण्यासाठी माझ्याकडे आले. शिक्षकांनी तसे करण्यास सांगितले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मला वाटले की हे योग्य नाही. आणि अशा प्रकारे मी ही घटना माझ्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून व्हॉट्सअॅपवर शेअर केली.#Karnataka edun dept in #Gadag has ordered an investigation after visuals of 6 & 7th standard students cleaning school toilets came to light. Parents allege- as punishment they were made to clean toilets. Dept says- inquiry ordered. Incident happened at Govt school- Nagavi. pic.twitter.com/nsonIV3T0t
— Imran Khan (@KeypadGuerilla) July 27, 2022