Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेल्फीच्या नादात तरूणाचा मृत्यू

death
, शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (16:25 IST)
बिहारच्या नालन्दा येथे काळजाला थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे. एका मालगाडीवर दोन तरुण चढून सेल्फी घेत असताना हायटेंशन वायरच्या संपर्कात येऊन एका तरूणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ दूरवर असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. ही घटना बुधवारची आहे. 
रुळावरून घसरलेल्या एका मालगाडीच्या बोगीवर चढून 2 तरुण सेल्फी काढताना अचानक हायपरटेन्शनच्या वायरच्या संपर्कात येऊन होरपळले.
 
नालंदातील फतुहा इस्लामपूर रेल्वे विभागातील एकंगसराय रेल्वे स्थानकालगत एका मालगाडीचे 9 डबे रुळावरुन घसरले होते. या डब्यांवर सेल्फी घेण्याच्या नादात एका युवकाचा बळी गेला. राजेंद्र हलवाई (16) असे मृत व्यक्ती चे नाव आहे , तर छोटू कुमार जखमी तरुणाचे नाव आहे. जखमी तरुणाला पुढील उपचारांसाठी पाटण्याला हलवण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ गुरूवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

सदर मालगाडी कोळसा घेऊन इस्लामपूरहून फतुहाकडे जात होती. पण रस्त्यात एकंगसराय रेल्वे स्थानकालगत तिचे 9 डबे रुळावरुन घसरले.आणि त्यावर चढून या तरुणांनी सेल्फीच्या नादात आपले प्राण गमावले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दीपक केसरकरः एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवून एकत्र येऊ असं ठाकरेंनी भाजपाला सांगितलं होतं