Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

PAN आणि ITR साठी आधार जरूरी: 10 प्रोसेसमध्ये बनवा 'आधार कार्ड'

PAN  आणि  ITR साठी आधार जरूरी: 10 प्रोसेसमध्ये बनवा 'आधार कार्ड'
सरकारच्या नवीन निर्णयानंतर आता पेन कार्ड बनवण्यासाठी आणि इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करण्यासाठी आधार कार्ड गरजेचा असेल. अशात बरेच निर्देश देण्यात आले आहे जेथे आधार कार्ड बगैर प्रोसेस पूर्ण होणार नाही. म्हणून जर आतापर्यंत तुम्ही आधार कार्ड बनवले नसेल तर ते ताबडतोब बनवणे गरजेचे आहे. तर आज आम्ही जाणून घेऊ कोणत्या 10 प्रॉसेसला फॉलो करून तुम्ही आधार कार्ड बनवू शकता.  
 
आधार कार्ड कसे बनवायचे :
 
1. आधार कार्ड नामांकन भारतात राहणार्‍या लोकांसाठी मोफत आणि स्वैच्छिक आहे. तुम्ही भारतात कुठेही, कोणत्याही जागेवर  आधार कार्डसाठी आवेदन करू शकता.  
 
2. तुमच्या एखाद्या जवळच्या आधार कार्ड केंद्रावर ऑनलाईन अपॉइंटमेंटची सेवा उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर आवश्यक डाक्यूमेंट्स तयार करा आणि अपॉइंटमेंट तारीख आणि वेळेवर आधार कार्ड केंद्रावर उपस्थित व्हा.   
 
3. जर तुमचा भागात ऑनलाईन अपॉइंटमेंटच्या वेबसाइटवर उपलब्ध नसेल तर आधार कार्ड बनवण्यासाठी स्वत: एखाद्या जवळच्या आधार कार्ड केंद्रा जावे लागेल. आधार कार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंटच्या बगैर देखील आपल्या जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जाऊ शकता.  
 
4. आधार कार्ड बनवण्यासाठी 1 ओळखपत्र आणि 1 अॅड्रेस प्रुफची गरज पडते.   
 
5. परिवारात जर एखाद्या व्यक्तीजवळ आवश्यक डाक्यूमेंट्स नसतील, पर त्याचे नाव परिवार पात्रता डाक्यूमेंट्समध्ये सामील असेल तर तो व्यक्ती आधार कार्डसाठी आवेदन करू शकतो. अशात परिवाराच्या प्रधानाला सर्वप्रथम आपले ओळखपत्र आणि अॅड्रेस प्रमाण डाक्यूमेंट्ससोबत आधार कार्डसाठी आवेदन करू शकतो.  
 
यानंतर घरातील प्रमुख व्यक्ती परिवारातील दुसर्‍या सदस्याला आधार कार्डच्या आवेदनासाठी परिचय देऊ शकतो. जर परिवारातील व्यक्तीजवळ आवश्यक डाक्यूमेंट्स नसतील तर तुम्ही आधार कार्ड केंद्रावर उपलब्ध इंट्रोडूसर्सची मदत घेऊ शकता.
webdunia
6. तुम्ही आधार कार्ड केंद्रावर जाऊन देखील आधार कार्ड फार्म प्राप्त करू शकता, किंवा ऑनलाईन आधार कार्ड फार्म डाउनलोड करू शकता.  
 
7. आधार कार्ड केंद्रावर वेळेची बचत करण्यासाठी तुम्ही अगोदरच आधार कार्ड फार्म डाउनलोड करून त्याला भरून तयार ठेवू शकता. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे परिवाराच्या प्रत्येक सदस्याला वेग वेगळे आधार कार्ड फार्म भरणे आवश्यक आहे.  
 
8. केंद्रावर आधार कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेत तुमचे फोटो, फिंगर प्रिंट्स आणि आयरिश स्कॅन घेण्यात येतील.  
 
9. आवेदन दरम्यान तुम्हाला आधार कार्डची स्लिप/रसीद देण्यात येईल ज्यात आवेदन क्रमांक आणि तुमची इतर माहिती असेल. या स्लिप/रसीदीला सांभाळून ठेवणे गरजेचे आहे, जेव्हा आधार कार्ड बनून तयार होईल तेव्हा तुम्ही या स्लिप/रसीदीचे आवेदन क्रमांकाच्या आधारावर डुप्लिकेट आधार कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता.  
 
10. तुम्ही दिलेल्या माहितीचे विवरण केंद्रीय कार्यालयातून चौकशी होईल. यशस्वी चौकशी झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी तुमचे आधार कार्ड क्रमांक तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवर SMS आणि तुमच्या रजिस्टर्ड ईमेल IDवर पाठवण्यात येईल आणि लगेचच तुमचे आधार कार्ड प्रिंट करून पोस्टाद्वारे तुम्ही दिलेल्या पत्ता वर पाठवण्यात येईल.  सामान्य रूपेण आधार कार्ड 30 ते 60 दिवसांमध्ये बनून येते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कामुक भूत! केवळ महिलांची काढतो छेड...