Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चोवीस आठवड्यापर्यंतचा गर्भ पाडता येणार

चोवीस आठवड्यापर्यंतचा गर्भ पाडता येणार
चोवीस आठवड्यापर्यंतचा गर्भ पाडण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. याआधी वीस आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यास परवानगी होती. गर्भपाताबाबतच्या नियमावलीत बदल करण्यासाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेगनन्सी सुधारणा विधेयक आणले जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 
गर्भपात करण्याची मर्यादा २० वरुन २४ आठवड्यापर्यंत वाढविण्यात आल्यामुळे सुरक्षितपणे गर्भपात करता येतील तसेच मुल जन्माला घालायचे की नाही, याबाबतचा महिलांचा हक्‍क शाबूत राहील, असे जावडेकर म्हणाले. बलात्कार पीडीत महिला, दिव्यांग महिला तसेच अल्पवयीन मुलींना २४ व्या आठवड्यात गर्भपात करण्यास परवानगी देण्यात आल्याने मदत मिळेल. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ND vs NZ LIVE / सुपरमध्ये ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला, रोहितने शेवटच्या 2 चेंडूत 2 षटकार ठोकले