दिल्ली हे अपघातांचं शहर बनत आहे. दिल्लीत कॅनॉट प्लेस परिसरातून हृदयद्रावक अपघाताची बातमी समोर येत आहे. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरातील आऊटर सर्कल भागात वाहनांची तपासणी करताना एका पोलीस कर्मचाऱ्याला एसयूव्ही कारने जोरदार धडक दिली. या अपघातात पोलीस कर्मचारी वेगाने उंच उडाला आणि फेकला गेला.या अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ही घटना 24 ऑक्टोबर रोजीची आहे. वाहनांची तपासणी घेत असताना पोलीस कर्मचारी रवी सिंह यांना मागून वेगाने येणाऱ्या एसयूव्ही कार ने जोरदार धडक दिली आणि ते लांब फेकले गेले. या अपघातात ते जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघाता नंतर कार चालक पसार झाला. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये कॅनॉट प्लेस सर्कल मध्ये चेकपोस्ट जवळ एक पोलीस कर्मचारी वाहनांची तपासणी करताना दिसत आहे. त्यात एक वेगाने येणारी एसयूव्ही ने त्याला जोरदार धडक दिली आणि या अपघातात पोलीस कर्मचारी हवेत उडाला असून अनेक फुटावर लांब फेकला गेला. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागला आहे. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.
हा व्हिडीओ पहिल्यांनंतर लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक व्हिडीओ पाहिल्यावर संतापले असून कार चालकावर चिडत आहे. या अपघातानंतर वाहन चालकाला पोलिसानी ताब्यात घेतले आहे.
या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे.