Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, ४ ठार

Accident
, शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (16:08 IST)
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोर घाटात ट्रक आणि कारच्या विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बोर घाटात आडोशी बोगद्याजवळ हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने चाललेला ट्रक आडोशी बोगद्याजवळ आल्यानंतर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व ट्रक मुंबई लेनवरुन पुणा लेनमध्ये घुसला व पलटी झाला. 
 
या अपघाताच्यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन गाडया ट्रकखाली चिरडल्या गेल्या. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. हा अपघातामध्ये की, एक कार १०० फूट खोल दरीत कोसळली. या ट्रकमध्ये सिमेंटच्या बॅगा भरलेल्या होत्या.अपघातानंतर सर्व सिमेंट रस्त्यावर पसरल्याने पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिलिंडर स्फोटात ४ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू