भारताने अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ओडिशाच्या तटावर अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे. सदरची चाचणी डिफेन्स रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून (डीआरडीओ) करण्यात आली आहे. आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची ही चौथी आणि शेवटची चाचणी होती. यावेळी पूर्ण क्षमतेने या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. संपूर्ण चीन अग्नी-५ च्या कक्षेत असणार आहे. अग्नी-५ अण्वस्त्र वाहून नेण्यातही सक्षम असणार आहे.