अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन आज संपन्न होतआहे. मात्र अहमदाबादमध्ये भगवान राम यांचे चॉकलेट मंदिर बांधले गेले आहे. हे मंदिर रामभक्त शिल्पा भट्ट यांनी तयार केले आहे. शिल्पा भट्ट या पेशाने चॉकलेट तयार करतात. चॉकलेटचे राम मंदिर तयार करण्यासाठी शिल्पा यांना १५ किलो चॉकलेट लागले.
हे चॉकलेटचे मंदिर अयोध्येतील राम मंदिर सारखेच दिसते. १५ किलो चॉकलेटचे हे मंदिर तयार करण्यासाठी १२ तास शिल्पा यांना लागले आहेत. शिल्पा भट्ट म्हणाल्या की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे मंदिर भेट म्हणून देण्याची इच्छा आहे. पंतप्रधानांच्या इच्छा शक्तीमुळे राम मंदिर उभारण्यासाठी भूमिपूजन होणार आहे. हे चॉकलेट मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचले नाही तर भगवान रामाचा प्रसाद म्हणून लहान मुलांमध्ये वाटले.’ असे त्यांनी सांगितले.