Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Air Hostess Murder Case एअर होस्टेस खून प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

suicide
, शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (11:46 IST)
Air Hostess Murder Case रायपूर एअर होस्टेसच्या हत्येप्रकरणी मुंबईतील अंधेरी पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये दाखल असलेल्या आरोपी विक्रम अटवाल (50) याने आत्महत्या केली आहे. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह बॅरेकमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आरोपीने चड्डीला गळफास घेऊन आत्महत्या केली.
 
ट्रेनी एअर होस्टेस रुपल ओगरे हिचा मृतदेह तिच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये 3 सप्टेंबर रोजी सापडला होता. या आरोपावरून घरातील नोकर विक्रम अटवाल याला अटक करण्यात आली.
 
पोलिसांनी आरोपी विक्रम अटवाल याला न्यायालयात हजर केले होते. जिथे त्याला 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
 
24 वर्षीय रुपल ओगरे नुकतीच एअर होस्टेसचे प्रशिक्षण घेण्यासाठी रायपूरहून मुंबईत आली होती
 
याच इमारतीत आरोपी हाऊस किपिंगचे काम करायचा   
ट्रेनी एअर होस्टेस रुपल ओगरे या मुंबईतील एनजी कॉम्प्लेक्समधील एका इमारतीत राहत होती. याच इमारतीत आरोपी विक्रम अटवाल हा हाउस किपिंगचे काम करायचा. 3 सप्टेंबर रोजी आरोपी फ्लॅटमध्ये कचरा वेचण्यासाठी घुसला. जिथे त्याचा रुपलसोबत काही मुद्द्यावरून वाद झाला. दरम्यान, आरोपीने मुलीवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने हल्ला केला, त्यानंतर संधी मिळताच त्याने मुलीचा गळा चिरून खून केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटलांवर उधळला भंडारा