Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले
, रविवार, 19 मे 2024 (13:20 IST)
बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (KIA) शनिवारी मोठी दुर्घटना टळली. कोचीला जाणाऱ्या एअरइंडिया एक्स्प्रेसच्या विमानाने उड्डाण करतातच इंजिनला आग लागली. इंजिनला आग लागल्याचे कळतातच विमानातील प्रवाशांमध्ये घबराहट पसरली. या विमानात 179 प्रवाशी प्रवास करत होते. या नंतर विमानाला तातडीने KIA विमान तळावर उतरावे लागले. बंगळुरू विमानतळावर पूर्ण आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली होती. 
 
बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (BIAL) केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करते.KIA देशातील तिसरा सर्वात मोठा व्यस्त विमानतळ आहे.बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, फ्लाइट IX 1132 विमानाच्या इंजिनला आग लागल्यानंतर रात्री 11.12 वाजता विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.  विमान विमानतळावर उतरताच आग विझवण्यात आली.

विमानातील सर्व 179 प्रवासी आणि सर्व 6 क्रू मेंबर्सना विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. 
इंजिनला लागलेल्या आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. प्रवाशांना दुसऱ्या विमानाने कोचीला पाठवण्यात आले आहे. 
 
Edited by - Priya Dixit
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल