Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राइक, सुमारे 300 दहशतवादी ठार

भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राइक, सुमारे 300 दहशतवादी ठार
नवी दिल्ली- पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करत भारतीय वायुसेनाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास जैश ए मोहम्मदच्या हुतांशी दहशतवादी तळांवर 1000 किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकल्याला जाण्याची बातमी आहे. 
 
सूत्रांप्रमाणे भारतीय वायूसेनेच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर 1000 किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकल्याचे वृत्त आहे. पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. 12 मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यामुळे जैशचे ठिकाणे पूर्णपणे नष्ट झाले आहेत. पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. 
 
या हल्ल्यात सुमारे 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 
 
उल्लेखनीय आहे की पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने  या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. भारताने 12 दिवसात पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेऊन पाकला त्याची जाग दाखवून दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाबरी मशीद जमीन वाद खटल्याची आज सुनावणी