Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

अजय राय यांनी स्मृती इराणींवर आक्षेपार्ह वक्तव्य केले

ajay rai
, शनिवार, 13 एप्रिल 2024 (14:53 IST)
उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी स्मृती इराणींवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यांनी स्मृती यांना मानसिकदृष्टया वेडे ठरवले आहे. ते म्हणाले स्मृती इराणी यांची मानसिक पातळी घसरली आहे आणि त्या वेड्या झाल्या आहेत. मी मोदीजींना विनंती करेन की त्यांनी ताबडतोब चांगल्या मानसिक डॉक्टरांना दाखवावे, जेणेकरून त्यांचे मानसिक उपचार सुरू होऊ शकतील.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. त्याआधी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार आपापल्या भागात प्रचारात व्यस्त आहेत पश्चिम यूपीच्या अनेक जागांवर मतदान होण्याआधी भाजप आणि विरोधी पक्षांचे अनेक नेते येथे प्रचारसभा घेत आहेत, तर काही जागांवर उमेदवारांची घोषणा झालेली नाही तरीही, त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे अमेठी ही लोकसभेची जागा आहे जी नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिली आहे, परंतु काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही

अमेठीमध्ये राहुल गांधींवर सतत निशाणा साधणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी जोरदार हल्लाबोल करत स्मृती इराणींना वेडे ठरवले आहे.अमेठीमध्ये राहुल गांधींवर सतत निशाणा साधणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी जोरदार हल्लाबोल करत स्मृती इराणींना वेडे ठरवले आहे.
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिडनी मॉलमध्ये हल्लेखोर चाकू घेऊन पळाला,गोळीबारात चार जणांचा मृत्यू