रेल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दीमुळे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, रेल्वे प्लॅटफॉर्मवरील गर्दी सहन करा, ट्रेनमध्ये घुसण्यासाठी धडपड सहन करा, आरक्षित सीटवर अनधिकृत लोकांना सहन करा आणि ट्रेनमध्ये चोरीची भीती सहन करा. आज प्रवासी म्हणतात, भाजप नको!
तसेच अखिलेश यादव म्हणाले की, दिवाळी आणि छठ सणाच्या दिवशी देशाच्या विविध भागात काम करणारे लोक सण साजरा करण्यासाठी त्यांच्या घरी जात असतात. अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवासी आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याच्या चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. तसेच ते म्हणाले की, लखनौ असो की दिल्ली, मुंबई असो की कोलकाता, सणांमुळे जवळपास सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. गर्दीमुळे मुंबई स्थानकावर चेंगराचेंगरी झाली, त्यात अनेक प्रवासी जखमीही झाले. ही परिस्थिती प्रत्येक वेळी पाहायला मिळते, पण सुविधांचा अभाव नेहमीच दिसून येतो आहे.
Edited By- Dhanashri Naik