Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अक्षय कुमारचे राजनाथ सिंह यांनी मानले आभार

अक्षय कुमारचे राजनाथ सिंह यांनी मानले आभार
, शुक्रवार, 17 मार्च 2017 (13:10 IST)

अक्षय कुमारने सुकमा येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी केलेल्या आर्थिक मदतीबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्याचे आभार मानले आहेत. सुकूमा येथे 11 मार्च रोजी माओवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 12 जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांच्या प्रत्येक कुटुंबाला अक्षय कुमारने 9 लाखांची मदत दिली आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे घटनेनंतर लगेचच अक्षय कुमारने गृहमंत्रालयाशी संपर्क साधला होता. आर्थिक मदत करता यावी यासाठी अक्षयने शहिदांच्या कुटुंबियांचं बँक खातं क्रमांक पुरवण्याची विनंती केली होती. मंत्रालयाने त्यांची विनंती स्विकार करत सीआरपीएफमधील शहीद जवानांच्या कुटुंबियांची बँक खाती क्रमांक पुरवण्याचे आदेश दिले होते. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एमपीएससी परीक्षा निकाल : नाशिकचे भूषण अशोक अहिरे राज्यात प्रथम