Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमरनाथ दहशतवादी हल्ला : बस ड्रायव्हरच्या शब्दांमध्ये.... See Video

अमरनाथ दहशतवादी हल्ला : बस ड्रायव्हरच्या शब्दांमध्ये.... See Video
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रा करून परत असताना गुजरातच्या यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवाद्याने बसवर अंधाधुंदरित्या गोळ्या झाडल्या. मिडियासोबत बोलताना बसचा ड्रायव्हर सलीम शेखने सांगितले की आधीतर माझे डोकं कामच करत नव्हते. पण नंतर लक्षात आले की बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. बसला 25 दहशतवाद्यांनी घेरले होते पण मी बस न थांबवत फूल स्पीडमध्ये बस चालवली.  
webdunia
एका दहशतवाद्याने नंतर बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला पण कंडक्टरने त्याला धक्का देऊन बाहेर काढले आणि बसचे दार बंद केले. जर तो आत शिरला असता तर एकही जीव वाचला नसता. त्या सर्व दहशतवाद्यांनी बाहेरून गोळ्या झाडणे सुरू केले होते. मला खांद्यावर आणि पायावर गोळी लागली आणि त्यामुळे माझे डोकं सुन्न झाले होते पण मी परिस्थितीबघून फूल स्पीडमध्ये गाडी चालवली. 5 km.च्या अंतरावर आर्मीची गाडी मिळाली तेव्हा आर्मीचे जवान दहशतवाद्यांच्या पाठीमागे धावले पण तोपर्यंत ते पळ काढण्यात यशस्वी झाले होते.  
साभार : इंडिया टीव्ही 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाणीपुरवठाच्या 171 प्रकल्पांचे एकाच वेळी ई-भूमिपूजन