rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा कमांडर अबू इस्माईलचा खात्मा

lashkar taiba
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू इस्माईलचा हा अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. त्याला श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांनी खात्मा केला आहे . ही सर्व चकमक नौगाममध्ये झाली आहे. देशद्रोही अबूसह त्याचा अजून एक सोबती अतिरेकी ठार झाला आहे. चुकीचे काही लोन पसरू नये म्हणून सैन्याने या परिसरात श्रीनगरमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.
सुरक्षा दल अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू इस्माईलचा शोध घेत होते. त्यासाठी अनेक ठिकाणी शोधमोहीम केली होती. हा अतिरेकही अबू पाकिस्तानचा रहिवासी होता. मात्र आपल्या देशा विरोधात तो तीन वर्षांपासून काश्मिरात सक्रिय झाला होता. यामध्ये आपल्या गुप्तचर आणि सैन्य तपास संस्थांनी अबू इस्माईलला अखेर सापडून काढले आणि बदला घेतला आहे. अमरनाथ येथून परतत असतांना अनंतनाग येथे 10 जुलै रोजी यात्रेकरुंच्या बसवर अतेरिकी बेछूट गोळीबार केला होता. यात 5 महिला यात्रेकरुंसह 8 जणांचा मृत्यू झाला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विश्वचषक फुटबॉल: "महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन"