Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 10 April 2025
webdunia

अमित शहा राज्यसभा निवडणूक लढवणार

Amit Shah
, गुरूवार, 27 जुलै 2017 (14:49 IST)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राज्यसभा निवडणूक लढवणार आहे. गुजरातमधून ते निवडणूक लढवतील. तसंच त्यांच्यासोबत स्मृती इराणी याही निवडणूक लढवणार आहे. भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अमित शहा राज्यसभेची निवडणूक लढवतील असा निर्णय झाला अशी माहिती केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी दिली.

अमित शहा गुजरातमधून विद्यमान आमदार आहे. राज्यसभेवर जाण्यासाठी आता अमित शहा आमदारकीचा राजीनामा देतील. शहा यांच्यासोबत स्मृती इराणी याही राज्यसभेची निवडणूक लढवतील. तसंच मध्यप्रदेशमधील एकमात्र राज्यसभेच्या जागेसाठी संपतिया उइके यांना उमेदवारी देण्यात आलीये. उइके हे आदिवासी नेते आहे. मध्यप्रदेशमधील पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी या जागेसाठी पोटनिवडणूक होतेय.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता राजद कोर्टात जाणार