Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 11 April 2025
webdunia

अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल

Amit Shah
, मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (16:13 IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रात्री २ वाजता राजधानी दिल्लीस्थित असलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी अमित शाह हे नुकतेच कोरोनातून बरे होऊन घरी परतले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. अमित शाह यांना श्वसनाचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखाली शाह यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 
अमित शाह यांना रात्री २ वाजता थोडा ताप जाणवू लागल्यामुळे त्यांना तात्काळ एम्सच्या खासगी कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १४ ऑगस्ट रोजीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मिशेल ओबामा यांचे डोनाल्ड ट्रम्पवर भयंकर हल्ला – म्हणाल्या आमच्या देशासाठी चुकीचे राष्ट्रपती आहेत