Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अरुणाचल प्रदेशातील सियांगमध्ये लष्कराचे रुद्र हेलिकॉप्टर कोसळले

अरुणाचल प्रदेशातील सियांगमध्ये लष्कराचे रुद्र हेलिकॉप्टर कोसळले
, शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (12:35 IST)
अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील सिंगिंग गावाजवळ लष्कराचे हेलिकॉप्टर रुद्र कोसळले. हे ठिकाण टुटिंग मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर आहे.  
 
गुवाहाटी डिफेन्स पीआरओच्या म्हणण्यानुसार, तुटिंगपासून 25 किमी अंतरावर असलेल्या सिंगिंग गावाजवळ लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. जिथे हा अपघात झाला, तो रस्त्याने जोडलेला नाही. मात्र, बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. 
 
लष्कराचे हेलिकॉप्टर रुद्र क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे. रुद्र हे लष्कराचे अटॅक हेलिकॉप्टर आहे. हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने भारतीय लष्करासाठी बनवले आहे. हे वेपन सिस्टीम इंटिग्रेटेड (WSI) Mk-IV हे  हलक्या वजनाच्या ध्रुव हेलिकॉप्टरची आवृत्ती आहे.  
 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Russia-Ukraine War: रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान