Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गर्भवती पत्नीला HIV बाधित रक्ताचे इंजेक्शन देण्याचा कट

गर्भवती पत्नीला HIV बाधित रक्ताचे इंजेक्शन देण्याचा कट
, सोमवार, 19 डिसेंबर 2022 (12:13 IST)
आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने आपल्या गर्भवती पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा भयंकर प्लॅन केला. त्याने आपल्या पत्नीला HIV बाधित रक्ताचे इंजेक्शन दिले. तिचा पती हुंड्यासाठी छळ करत असून मुलाला जन्म देण्यास भाग पाडत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस तपास करत आहेत.
 
वृत्तानुसार आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे घटस्फोटाच्या बहाण्याने विवाहबाह्य संबंध असलेल्या एका व्यक्तीने आपल्या गर्भवती पत्नीला एचआयव्ही बाधित रक्ताचे इंजेक्शन एका झोलाछाप डॉक्टरच्या मदतीने लावले.
 
पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली की घटस्फोट घेण्यासाठी तिच्या पतीने तिला एचआयव्ही बाधित रक्ताचे इंजेक्शन दिले. पीडित महिला विजयवाडा येथील ताडेपल्ले येथील रहिवासी आहे. पोलिसांनी पीडितेच्या पतीला ताब्यात घेतले आहे.
 
या दाम्पत्याला मुलगी असून तिचा पती हुंड्यासाठी छळ करत होता आणि मुलाला जन्म देण्यासाठी प्रताडित करत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 
सांकेतिक फोटो

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झारखंडमध्ये इलेक्ट्रिक कटरने मृतदेहाचे 50 तुकडे केले