Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंध्र प्रदेश : सावत्र बापाने 13 वर्षीय मुलीला पुलावरून ढकलले, सुदैवाने बचावली

social media
, मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (09:21 IST)
आंध्र प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गुंटूर जिल्ह्यात एक 13 वर्षीय मुलीला तिच्याच सावत्र बापाने गोदावरी नदीत ढकलून दिल्याची बातमी समोर आली आहे, मात्र सुदैवाने मुलीने पुलाला लटकून आणि पोलिसांना 100 डायल करून तिचा जीव वाचला. 
 
गुंटूर जिल्ह्यात आपल्या सावत्र मुलीची सुटका करण्यासाठी एका व्यक्तीने तिला पहाटे गोदावरी नदीत ढकलून दिल्याचे उघड झाले आहे. उलवा सुरेश असे या व्यक्तीचे नाव आहे. आपल्या 13 वर्षांची सावत्र मुलगी कीर्तना पासून सुटका करण्यासाठी रविवारी सकाळी तिला गोदावरी नदीत ढकलून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सुरेशने पत्नी सुहासनी आणि एक वर्षाची मुलगी जर्सीलाही नदीत ढकलून दिल्याचे  सांगण्यात येत आहे. 
 
असे सांगितले जात आहे की कीर्तनाने प्लास्टिकचा पाईप घट्ट पकडला आणि नंतर एका हाताने तिच्या फोनवरून 100 डायल केला. त्या मुलीचे म्हणणे ऐकून पोलिसांनी तातडीनं कारवाई करत घटनास्थळी पोहोचून त्या पुलाच्या केबलला लटकलेल्या मुलीला वाचवले. ही घटना 6 ऑगस्टची आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मुलीने 100 वर कॉल केला होता.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने सांगितले की तिला तिच्या वडिलांनी ढकलले होते पण योगायोगाने पुलाखालील प्लास्टिकचा पाईप तिच्या हातात आला आणि तिने तो पकडला आणि त्यामुळे ती तिथेच लटकली. तर तिचे वडील सुरेश यांनीही तिची आई व लहान बहिणीला नदीत ढकलून दिले आणि दोघीही पाण्यात पडून बेपत्ता झाल्या. पोलिसांची माहिती मिळताच, रावुलापलेम पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आणि रावुलापलेम एसएसआय त्यांच्या कर्मचार्‍यांसह पहाटे 4 वाजेच्या सुमारास मुलीने ज्या ठिकाणी लटकलेली होती तेथे पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी पुलाच्या पाइपलाइनला अत्यंत धोकादायक अवस्थेत लटकली होती
 
पोलिसांनी पाईप वर लटकलेल्या तरुणीला धीर देत पोलीस कर्मचार्‍यांसह महामार्गावरील मोबाईल कर्मचाऱ्यांसह मुलीची सुटका केली. मुलीची सुटका केल्यानंतर तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी कीर्तना असे या तरुणीचे नाव आहे. ती आईसोबत राहत होती. त्या रात्री तिचे वडील संपूर्ण कुटुंबाला राजमुंद्री येथे घेऊन जाण्यासाठी निघाले आणि ते कारमधून रवुलापलेम पुलावरून जात असताना सुरेशने आई आणि मुलींना सेल्फी घेण्यासाठी खाली उतरवले आणि नंतर तिघांनाही उलटे ढकलले. पण योगायोगाने कीर्तनाने पाईपच्या साहाय्याने केबल धरून तिथेच लटकली. तर त्याची आई व बहीण पाण्यात पडून वाहून गेले. 
 
मुलीकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी दोन पथके तयार करून बोटीच्या मदतीने गोदावरीच्या वाढलेल्या पाण्यात आई आणि मुलीचा शोध सुरू केला. आरोपी सुरेशही फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या दिशेने पथके रवाना करत आहेत. 
 
 
 
 
 



Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pakistan: बलुचिस्तानच्या पंजगुरमध्ये भूसुरुंग स्फोट, सात जण ठार