Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जयपूर-अजमेर महामार्गावर पुन्हा अपघात, ट्रक आणि बसची भीषण धडकेत 10 जण जखमी

जयपूर-अजमेर महामार्गावर पुन्हा अपघात, ट्रक आणि बसची भीषण धडकेत 10 जण जखमी
, मंगळवार, 24 डिसेंबर 2024 (10:24 IST)
Jaipur News: राजस्थानची राजधानी जयपूरचा अजमेर हायवे मोठ्या अपघातांचे केंद्र बनत आहे. आज पुन्हा एक मोठी दुर्घटना घडली. सोमवारी एका बसला अपघात झाला, ज्यामध्ये 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, अजमेर हायवेवर चांदपोलहून बागरूकडे जाणाऱ्या लो फ्लोअर बसला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात बसमध्ये बसलेले सुमारे 10 प्रवासी जखमी झाले. प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजमेर रोडवरील हायवे किंग हॉटेल बागरूजवळ हा अपघात झाला.
 
तसेच बागरू पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संद्याकाळी साडेसात वाजता अजमेर रोडवरील हॉटेल हायवे किंग बागरूजवळ एका बसला अपघात झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.  

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पनवेलला जायचं होतं पण कल्याणला पोहचली, हायटेक वंदे भारत ट्रेन कशी रस्ता चुकली? रेल्वेने दिले कारण