Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोटामध्ये NEET ची तयारी करणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

suicide
, शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (23:31 IST)
कोटा जिल्ह्यात एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे प्रकरण पुन्हा समोर आले आहे. नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच NEET ची तयारी करणारा विद्यार्थी त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. अनिकेत कुमार असे या मयत  विद्यार्थ्यांचे नाव आहे गेल्या दहा दिवसांतील आत्महत्येची ही चौथी घटना आहे. या वर्षात आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
 
मयत अनिकेत कुमार (17) हा उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील रहिवासी होता. तो कोटा येथील एका खासगी संस्थेतून NEET ची तयारी करत होता. अनिकेत हा इंद्र विहार येथील वसतिगृहात भाड्याने खोली घेऊन राहत होता. शुक्रवारी दुपारी अनिकेतच्या भावाने त्याला फोन केला, मात्र त्याने फोन उचलला नाही. अनेकवेळा फोन करूनही फोन उचलला नाही तेव्हा भावाने वसतिगृहाच्या वॉर्डनला खोलीत जाण्यास सांगितले. वॉर्डनने दरवाजा ठोठावला, पण उत्तर मिळाले नाही. यानंतर वसतिगृहात राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने खोलीत बघितल्यावर अनिकेत हा  लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर वॉर्डनने अनिकेतचा भाऊ आणि पोलिसांना माहिती दिली.
 
अनिकेतचा भावाने अभिषेकने सांगितले, लहान भाऊ तीन वर्षांपासून कोटा येथे NEET ची तयारी करत होता. त्याला इयत्ता 11वीत प्रवेश मिळाला होता. तो NEET ची तयारी करत होता. गुरुवारी रात्री अनिकेतचे घरी बोलणे झाले. मग तो असं काही बोलला नाही ज्यामुळे तो काळजीतअसलेला जाणवत होता.
 
वसतिगृहाच्या वॉर्डन निर्मला सोलंकी यांनी सांगितले की, इतर मुलांच्या मदतीने त्यांनी आत डोकावून पाहिले असता तो दोरीला लटकलेला दिसला. विद्यार्थ्याकडे नायलॉनची दोरी कुठून आली हाही मोठा प्रश्न आहे. आत्महत्या करण्यासाठी त्याने बाजारातून ही खरेदी केल्याचे समजते. जवाहरनगर पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले. माहितीवरून पोलीस अधिकारी वासुदेव म्हणाले, आत्महत्येचे कारण शोधले जात आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी एमबीएस रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सुरुवातीला आत्महत्येचे कारण तणाव असल्याचे सांगितले जात आहे.
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

COVID-19: कोरोनाच्या धोक्यासाठी भारतीय लष्कर सतर्क,मार्गदर्शक तत्त्वे जारी