Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एनआयएच्या चार्जशीटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे ; वाचा सविस्तर

एनआयएच्या चार्जशीटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे ; वाचा सविस्तर
, गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (08:34 IST)
सुमारे सहा महिन्यापूर्वी मुंबईसह केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने सुरु केलेल्या सखोल चौकशी प्रकरणी अनेक पुरावे आता उघड होऊ लागले आहेत. एनआयएच्या आरोप पत्रामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. यामुळे मुंबईतील अँटिलिया जवळ स्फोटकांनी भरलेली कार प्रकरण, मनसुख हिरेन हत्या, सचिन वाजेला अटक, प्रदीप शर्मा यांच्यावर खूनाचा आरोप अशा अनेक गुंतागुंतीच्या गोष्टींची उकल होऊ लागली आहे.
 
एनआयएने दि. ३ सप्टेंबर रोजी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले असून यात असे म्हटले आहे की, मनसुख हिरेन मर्डरचे काम माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला देण्यात आले. सचिन वाजे याने प्रदीप शर्माला खुनासाठी मोठी रक्कम दिली होती. या हत्येचा ठेका घेतल्यानंतर प्रदीप याने संतोष शेलार याच्याशी बोलून त्याला खुनात सामील होण्यास सांगितले. या संबंधित संशयित लोकांनी मिळून हिरेनचा खून केला. दि. ४ मार्च रोजी हिरेन मनसुखचा खून झाला, त्यापुर्वी दि. २ मार्च रोजी या सर्वांची बैठक झाली. या आरोपपत्रात पुढे म्हटले आहे की, दि.२ मार्च रोजी वाजे याने एक बैठक आयोजित केली होती त्यात एक पोलीस कर्मचारी सुनील माने आणि दुसरा पोलीस कर्मचारी प्रदीप शर्मा दोघेही उपस्थित होते. वाजे याने ही बैठक बोलावली, जेणेकरून दोघांना हिरेन कसा दिसतो आणि योजनेत कोणतीही अडचण येऊ नये याची माहिती मिळू शकेल. त्यामुळे सदर काम प्रदीप शर्माला देण्यात आले होते, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.
 
या षडयंत्राचा एक भाग म्हणून आरोपी प्रदीप शर्मा याने आरोपी संतोष शेलार याच्याशी संपर्क साधला आणि विचारले की तो पैशाच्या बदल्यात खून करू शकतो का ? त्यानुसार आरोपी संतोष शेलारने हे काम स्वीकारले. या प्रकरणातील वाजे आणि माने यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या उमेदवार म्हणून राज्य निवडणूक लढवण्यासाठी २०१९ मध्ये नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांचा पराभव झाला होता. आता तिघांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान,आरोपपत्रात असेही म्हटले आहे की, दि. ३ मार्च रोजी वाजे हे पुन्हा एकदा शर्मा याला भेटले आणि त्याला पैशांनी भरलेली बॅग दिली, त्यात सर्व ५०० रुपयांच्या नोटा होत्या. हे पैसे घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी शेलार यांना फोन करून लाल तवेराची व्यवस्था करण्यास सांगितले. हिरेनला मारण्यासाठी आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शर्माला या वाहनाचा वापर करायचा होता. विशेष म्हणजे याच आरोपपत्रात पुढे म्हटले आहे की, वाजे आणि माने यांनी ठरवल्याप्रमाणे बनावट कागदपत्रांच्या आधारे, पोलिस असल्याचे भासवले. तसेच माने यांनी दि. ४ मार्च रोजी संध्याकाळी मालाड येथे हिरेन त्याला भेटायला तयार केले. यावेळी माने याने हिरेन उचलले आणि शेलारकडे दिले, त्याच वेळी मनीष सोनी, सतीश मोथुकरी आणि आनंद जाधव या तिघांसह शेलार त्यांची वाट पाहत होते. या लोकांनी हिरेनला कारमध्येच ठार केले आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी