जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराचे एक अधिकारी शहीद झाल्याची बातमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या 48 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात असलेले कॅप्टन दीपक सिंह लष्कराच्या कारवाई दरम्यान शहीद झाले. लष्कराच्या म्हणण्यानुसार, या भागात अजूनही कारवाई सुरू आहे.
डोडामध्ये झालेल्या छोट्या चकमकीनंतर आज परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
बुधवारी सुरक्षा दल आणि अज्ञात दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत किमान एक दहशतवादी जखमी झाला.लष्कराने दहशतवाद्यांकडून एम 4 रायफल जप्त केली आहे
दहशतवादी असार नदीच्या किनारी भागात लपले आहेत. दहशतवाद्यांचा शोध सुरू असताना लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत लष्कराचे कॅप्टन दीपक सिंग हे गंभीर जखमी झाले त्यांना लष्करी रुग्णालयात नेले असता त्यांची प्राण ज्योत मालवली.