Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अरुण जेटली यांची प्रेस कॉन्फ्रेंस...

अरुण जेटली यांची प्रेस कॉन्फ्रेंस...
, शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (15:23 IST)
एकटया स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये २ कोटी २८ लाखाचे व्यवहार झाले, ४७८६८ कोटी रुपये एसबीआयमध्ये डिपॉझिट झाले - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.
 
- सध्याच्या एटीएम मशीन्समध्ये ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा देण्याची रचना आहे, नव्या नोटांसाठी एटीएमच्या रचनेमध्ये बदल करण्यात येईल, त्यासाठी काही दिवसांचा वेळ लागेल, हे सर्व आधी केले असते तर गुप्तता राहिली नसती - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.

- रांगेत उभे रहाणे टाळण्यासाठी मी लोकांना काही दिवसांनी बॅकेत जाण्याचे आवाहन करीन, नोटा बदलून घेण्याची योजना ३० डिसेंबरपर्यंत चालू राहील - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.
 
- आज दुपारी १२.१५ वाजेपर्यंत ५८ लाख लोकांनी नोटा एसबीआयमध्ये बदलल्या - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.
 
- नवी दिल्ली : बँक कर्मचारी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत काम करत आहेत, नागरिकदेखील बँकांना सहकार्य करत आहेत - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
 
- लोकांनी जे सहकार्य केलं आणि संयम दाखवला त्याबद्दल मी लोकांचे आभार मानतो - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.
 
- पहिले काही दिवस अडचणी येणार हे स्वाभाविक आहे कारण ८६ टक्के चलन बदलले आहे - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकच्या प्रेसमधून 5 दशलक्ष नोटा रवाना