नवी दिल्ली- कपिल मिश्रांच्या आरोपानंतर भाजपने अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भष्ट्राचारच्या आरोपानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
प्रामाणिकपणाचा आव आणाणार्या आपने दिल्लीकारांना लुबाडल्याचा आरोप भाजपने केला आहे. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले. आपने सुरूवातीला भष्ट्राचारविरोधात लढा दिला. पण आता त्यांच्याच पक्षातील नेत्यांवर भष्ट्रचाराचे आरोप होत असून या आरोपांची गंभीर दखल घेणे गरचेजे आहे.
केजरीवाला यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी विजय गोयल यांनी केली आहे.
काय आहे आरोप?
आम आदमी पक्षातील अंतर्गत संघर्ष पु्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. केजरीवाल यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेल्या कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीतील मंत्री सत्येंद्र जैन यांनी माझ्यासमक्ष केजरीवाल यांना दोन कोटी रूपये दिले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. हे पैसे कुठून आले आणि कशासाठी देण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.