Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आर्यन खानसह ३ जणांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा गुरूवारी दुपारी युक्तिवाद

आर्यन खानसह ३ जणांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा गुरूवारी दुपारी युक्तिवाद
, बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (21:56 IST)
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोपी असलेले आर्यन, अरबाज आणि मूनमूनचा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयात पुर्ण झाला. पण आर्यन खानसह ३ जणांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा गुरूवारी दुपारी युक्तिवाद होणार आहे. गुरूवारी दुपारी अडीच वाजता या प्रकरणात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यनला आणखी एक रात्र तुरूंगातच जाणार आहे. सलग दुसऱ्या दिवशी हायकोर्टाने या प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलत जामीन अर्जावर कोणताही दिलासा देऊ केलेला नाही. या प्रकरणातील पुढची सुनावणी गुरूवारी पार पडेल. या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून संपुर्ण युक्तीवादावर गुरूवारी बाजू मांडण्यात येणार आहे.
 
आर्यनच्या वतीने जेष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज झालेल्या सुनावणीत बाजू मांडली. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्यासाठीचा युक्तीवाद कोर्टात मांडण्यात आला. जेष्ठ वकील अमित देसाई यांनी अरबाज मर्चंटची बाजू मांडली. या प्रकरणात कट रचल्याचे सांगत संपुर्ण प्रकरण भरकटवत रिमांड घेण्यात आला. त्यावेळी कोणत्या प्रकरणात अटक झाली आहे हे सांगणे गरजेचे होते, असाही युक्तीवाद त्यांनी मांडला. तर मूनमून धमेचाकडून देशमुख यांनी बाजू मांडली. या संपुर्ण प्रकरणात सापडलेल्या ड्रग्जशी मूनमूनचा कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी युक्तीवाद दरम्यान केला. आर्यन खानला याआधीच दोनवेळा जामीन नाकारण्यात आला आहे. आर्यन खानला २ ऑक्टोबरला क्रूझवर पार्टी करताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतले होते. विशेष एनडीपीएस कोर्टाने आर्यनला गेल्याच आठवड्यात जामीन नाकारला होता. अरबाजने आपल्या बुटांमध्ये चरस लपवल्याची माहिती आर्यनला होती. त्यामुळे ड्रग्जबद्दल आर्यनला कल्पना होती असा युक्तीवाद एनसीबीकडून करण्यात आला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जलयुक्त शिवार योजनेला क्लिनचिट नाही, सदरच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही