Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थंडीमुळे एटीएमला गुंडाळली चादर

थंडीमुळे एटीएमला गुंडाळली चादर
लाहोल-स्पिती, (हिमाचल प्रदेश) , बुधवार, 10 जानेवारी 2018 (14:46 IST)
उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी लोक उबदार आणि गरम कपडे घालून बाहेर पडत आहेत. पण हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पितीध्ये एक आश्चर्यजनक प्रकार बघायला मिळाला. लाहोल-स्पितीधील एसबीआयच्या बँक कर्मचार्‍यांनी चक्क एटीएम मशीनलाच चादर गुंडाळल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ही चादर एटीएम मशीनसाठीच बनवली गेली आहे. एवढेच नाही तर बँकेने एटीएम मशीनजवळ गरम हिटरही लावला आहे.
 
हिमवृष्टी आणि थंडीतील अतिशय कमी तापामानामुळे एटीएम मशीन गोठून ते ठप्प होऊ नये यामुळे बँक कर्मचार्‍यांनी त्याला चादरीने झाकले आहे. कडाक्याच्या थंडीत अनेकदा एटीएम मशीन गोठून ते काम करत नसल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

75 वर्षांच्या प्रियकराचा खून; 65 वर्षांची प्रेयसी निर्दोष