राजधानी दिल्लीतील एका रुग्णालयामध्ये डॉक्टरांवर हल्ला आणि नर्सिंग स्टाफसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी 56 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्पेअर पार्ट्सचे दुकान चालवणारा व्यक्ती वय 56 बुधवारी रात्री त्याच्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेला होता, तेथे त्याने डॉक्टरांवर हल्ला केला.
तसेच आरोपी डॉक्टरांना धमकावत होता आणि शिवीगाळ करत असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये घटनेचे 'रेकॉर्ड' केले. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी आरोपीला अटक करण्यात आली होती, मात्र नंतर त्याला जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर, इसरारने एक व्हिडिओ केला ज्यामध्ये तो म्हणाला की कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणात सुरू असलेल्या संपामुळे डॉक्टरांनी पत्नीची तपासणी करण्यास नकार दिल्याबद्दल त्याला राग आला होता. म्हणून त्याने हे कृत्य केले.
तसेच कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी आरोपीच्या पत्नीच्या आरोग्याच्या तक्रारीच्या आधारे तिला औषध दिले होते, परंतु तिच्या पतीने औषध घेण्यास नकार दिला आणि त्याऐवजी स्वत: च्या मार्गाने उपचार लिहून देण्यास सुरुवात केली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. रुग्णालयातील ज्युनियर यांनी सांगितले की जेव्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले तेव्हा तो हिंसक झाला आणि डॉक्टरांशी गैरवर्तन करू लागला. "आम्ही त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्याने आम्हाला शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि आमच्यापैकी काहींना मारहाण केली," डॉक्टर म्हणाले. त्याने आमच्या नर्सिंग स्टाफशीही गैरवर्तन केले.
Edited By- Dhanashri Naik