Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 March 2025
webdunia

प्रेयसीला फिरायला घेऊन गेला आणि रस्त्यात गळा घोटला

प्रेयसीला फिरायला घेऊन गेला आणि रस्त्यात गळा घोटला
, बुधवार, 3 एप्रिल 2019 (10:53 IST)
दिल्लीच्या शाहदरा जिल्ह्याच्या फर्श बाजार भागात एका तरुणाने फिरायला जायचे म्हणून प्रेयसीला सोबत घेतलं आणि अल्पवयीन मुलीचा गळा घोटून तेथून पळून गेला. प्रेयसीवर संशय असल्यामुळे त्याने हे कृत्य केले.
 
रक्ताने माखलेली 17 वर्षीय तरुणी खूप वेळेपर्यंत रस्त्यावर त्याच अवस्थेत पडली राहिली. रस्त्यावरील लोकांनी याबाबत पोलिसांना सूचित केले. या दरम्यान, कांति नगर येथील रहिवासी तरुणीची बहीण देखील तेथे पोहचली. तरुणीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले गेले.
 
पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करण्याचे प्रकरण दाखल करून आरोपी शेषनाथचा शोध लावायला सुरू केले आहे. पोलिसांप्रमाणे, तरुणी प्रेम नगर लोनीमध्ये आई-वडील आणि इतर नातेवाइकांसह राहते. मोठी बहीण फर्श बाजार भागात कांति नगर येथे राहते.
 
सुमारे तीन वर्षांपूर्वी तरुणीची शेषनाथसोबत मैत्री झाली होती. तो अनेकदा तिला बाइकवर फिरायला घेऊन जात असे. रविवार संध्याकाळी देखील ती शेषनाथसोबत फिरायला गेली होती. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिंदुत्वाच्या विरोधकांना देशद्रोही ठरवलं जातं- नयनतारा सहगल