Publish Date: Tue, 13 Dec 2016 (17:27 IST)
Updated Date: Tue, 13 Dec 2016 (17:32 IST)
उत्तर प्रदेशचे नगर विकास मंत्री मोहम्मद आजम खां यांनी '80 कोटी रुपयांचे कपडे घालून' स्वत:ला फकीर म्हणणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नोटाबंदी नंतर बँकांच्या बाहेर लाइनमध्ये उभे असलेले करोडो असहाय लोकांचा मजाक उडवण्याचा आरोप लावला आहे.
रामपुरच्या टांडा गावाच्या रामलीला मैदानावर सोमवारी रात्री एका जनसभेत खां यांनी म्हटले आहे की देशातील प्रत्येक माणसाला त्याच्या स्वत:च्या पैशासाठी भिकारी बनवले आहे. लग्नासाठी पैसे मिळत नसल्याने लोकांना आत्महत्या करावी लागत आहे.
या दरम्यान त्यांनी कटाक्ष करत मोदींना प्रश्न विचारला आहे की बादशहा काय हेच चांगले दिवस आहे? स्वत:ला फकीर म्हणणारे बादशहाला देशाची जनता पिशवी घेऊन अमेरिकेला पळू देणार नाही. पिशवीचा हिशोबतर द्यावाच लागेल.
webdunia
Publish Date: Tue, 13 Dec 2016 (17:27 IST)
Updated Date: Tue, 13 Dec 2016 (17:32 IST)