Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बी.एस. येडियुरप्पा:कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची राजीनाम्याची घोषणा

बी.एस. येडियुरप्पा:कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची राजीनाम्याची घोषणा
, सोमवार, 26 जुलै 2021 (13:01 IST)
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा हे आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.त्यांनीच स्वतः ही घोषणा केली.
 
"मी राजीनामा कुठल्यादी दु:खात देत नाही,आनंदाने राजीनामा देतोय," असं भावनिक होत येडियुरप्पा यांनी घोषणा केली.कर्नाटकमधील भाजप सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमात बी.एस.येडियुरप्पा बोलत होते.
 
भारतीय जनता पक्षानं 2019 साली 75 वर्षांच्या आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नेत्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवण्याचं धोरण सोडलं आणि बी.एस.येडियुरप्पा यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी बसवलं होतं.
 
त्यापूर्वी 2008 साली येडियुरप्पा जेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते दक्षिण भारतातले भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री होते. तीन वर्षांतच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.
 
त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या व्होट बँकेचं मोठं नुकसान केलं.
 
कर्नाटकच्या राजकारणातील अनुभवी नेता आणि लिंगायत समाजातील नेता म्हणून बी. एस. येडियुरप्पा यांचं राज्यात वर्चस्व राहिलं आहे. येडियुरप्पांचं कर्नाटकच्या राजकारणातील वर्चस्व पाहूनच नरेंद्र मोदी यांनी 2014 साली पंतप्रधानपदासाठी आपलं अभियान सुरू करण्याआधी त्यांना पक्षात बोलावलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टोकियो ऑलिम्पिक: अतनु-तरुणदीप आणि प्रवीण जाधव यांच्या तिरंदाजी संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली, कझाकस्तानला पराभूत केले