Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिरुवल्लूरमध्ये बागमती एक्स्प्रेस उभ्या असलेल्या रेल्वेला धडकली

Bagmati Express
, शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (22:46 IST)
तामिळनाडूमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात म्हैसूरहून दरभंगाला जाणारी बागमती सुपरफास्ट एक्स्प्रेस उभ्या असलेल्या मालगाडीच्या धडकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचेही माहिती समोर येत आहे. कावरप्पेट्टाई रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रेल्वे अधिकारींनी आणि बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होत असून बचावकार्यही सुरू करण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूतील तिरुवल्लूर येथे मोठा रेल्वे अपघात झाल्याची बातमी समोर आली असून म्हैसूरहून दरभंगा येथे जाणारी बागमती सुपरफास्ट एक्स्प्रेस उभ्या असलेल्या रेल्वेला धडकली. या भीषण अपघातामुळे रेल्वेला आग लागल्याचेही  प्राथमिक माहिती समोर आली आहे. 
 
तसेच या अपघातात अनेक जण जखमी होण्याची भीतीही पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की बचाव पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून या घटनेशी संबंधित अधिक चौकशी सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने अडीच तास आकाशात घातल्या घिरट्या