Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाडूला मिळाली 15.60 लाख रुपयांची किंमत

लाडूला मिळाली 15.60 लाख रुपयांची किंमत
हैदराबाद- देवाला अर्पण केलेल्या म्हणजेच नैवेद्य दाखवलेल्या अन्नाचा प्रसाद बनतो. या प्रसादाच्या सेवनाने चित्तशुद्धी होते, पाप नष्ट होते, असे मानले जाते. त्यामुळे भारतीय संस्कृतीत प्रसादाला अतिशय महत्त्व आहे. हैदराबादमधील बालापूर परिसरातील गणेशोत्सव मंडपातील लाडू प्रसादालाही स्थानिक लोकांमध्ये बरेच महत्त्व आहे. या लाडू प्रसादाचा नंतर लिलाव केला जातो व मोठ्या किमतीत तो विकला जातो. आताया लाडूला तब्बल 15.60 लाख रूपयांची किंमत मिळाली आहे.
 
नागम तिरूपती रेड्डी नावाच्या एका भक्ताने ही मोठी बोली लावून लाडूचा प्रसाद मिळवला. या प्रसादाने सर्व प्रकाराची भरभराट होते असाही तिकडे समज आहे. 1990 पासून अशा लाडूच्या लिलावची प्रथा सुरू आहे. सुरूवातीला त्याचा लिलाव 450  रूपयांना झाला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर १९ टीमसाठी निवड