Publish Date: Fri, 11 Nov 2016 (10:27 IST)
Updated Date: Fri, 11 Nov 2016 (10:28 IST)
चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर गुरुवारी सकाळी नोटा बदलण्यासाठी बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये लोकांची तुफान गर्दी झाली आहे. सकाळी बँक उघडण्याआधीपासून लोकांच्या लांबच लांब रांगा होत्या. अजूनही बहुतांश एटीएम बंद आहेत. येत्या शनिवार आणि रविवारदेखील बँका सुरू असणार आहेत. याशिवाय नोटांच्या बदल्यात केवळ 100 रुपयांच्या नोटा मिळतील, अशी अपेक्षा करू नये. याबदल्यात चिल्लरही मिळू शकतात असे आवाहन बँकांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.