Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बँक लॉकर सील करण्याच्या बातमीने लोकं परेशान

बँक लॉकर सील करण्याच्या बातमीने लोकं परेशान
500 आणि 1000 च्या नोटा चलनीतून बाहेर झाल्यामुळे लोकं तसेच हैराण आहे. त्यावरून काही लोकांनी अशी अफवा उडवली की आता ग्राहकांचे बँक लॉकरही सील केले जातील. आणि प्रत्येक लॉकरमध्ये एका ठराविक ग्रामापेक्षा अधिक सोनं-चांदी असल्यास ते जप्त करण्यात येईल.
अश्या अफवामुळे अनेक उपभोक्ता बँकेपर्यंत पोहचून गेले. परंतू बँक प्रबंधकाशी चर्चा केल्यानंतर माहीत पडले की ही असामाजिक तत्त्वांद्वारे पसरवण्यात आलेली निव्वळ अफवा आहे. या प्रकाराच्या अफवांकडे दुर्लक्ष करावे.
 
या अफवामुळे अनेक महिला बँकेत जाऊन आपले दागिने काढू इच्छित होत्या परंतू बँक प्रबंधकाद्वारे कारण विचारल्यावर हे प्रकरण समोर आले. नंतर बँक अधिकार्‍यांनी सर्वांना समजूत देऊन परत पाठवले आणि अश्या अफवांकडे दुर्लक्ष करण्याची अपील केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

...तर ब्लॅक मनी जमा केल्यावर 100 रुपय्यावर मिळतील 7 रुपये