बिहारमधील भागलपूरमध्ये वधूच्या भांगेत कुंकू भरल्यावर लग्न विधी पूर्ण करताना वराचा मृत्यू झाला. वराला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर वधू-वर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. तर पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून वधू बेशुद्ध झाली. 2 मे रोजी वराच्या छातीत दुखू लागल्याचे सांगण्यात आले.
झारखंडमधील पश्चिम सिंहभूममध्ये राहणाऱ्या विनीतचे भागलपूरमध्ये राहणाऱ्या आयुषीसोबत लग्न ठरले होते. 3 मे 2023 रोजी लग्न करण्याचे ठरले होते. विनीत हा दिल्लीतील एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि आयुषीही एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते.
बुधवारी (3 मे) विनीत वरात घेऊन शहरातील मिरजनहाट चौक, शितलास्थान येथील मातेश्वरी विवाह मंडपात पोहोचला. जयमाला, फोटो सेशन व इतर धार्मिक विधी पार पडले. गुरुवारी (4 मे) सकाळी वधूच्या भांगेत कुंकू भरले . विनीत बाथरूमला गेला होता. तेथून येताच त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले.घटनास्थळी उपस्थित लोकांनी विनीतला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो उठला नाही.
कुटुंबीयांनी विनीतला तातडीने रुग्णालयात नेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी विनीतला मृत घोषित केले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, विनीतला हृदयविकाराचा झटका आला होता.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, विनीतला 2 मे रोजीही छातीत दुखत होते. सगळ्यांना वाटले की गॅस मुळे दुखणे होत आहे. एक एक गोळी खाल्ल्यानंतर त्यालाही आराम मिळाला. त्यामुळे कोणी फारसे लक्ष दिले नाही.
विनीतच्या मृत्यूची बातमी समजताच दोन्ही कुटुंबात शोककळा पसरली आहे. विनीतचा अचानक मृत्यू झाला यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. दुसरीकडे पतीच्या निधनाची बातमी ऐकून आयुषी बेशुद्ध झाली.