Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममध्ये, महाराष्ट्रात नाहीच- आसाम सरकारचा दावा

bhima shankar
, बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (10:36 IST)
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर. महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे.
 
महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केला आहे. एवढंच नाही तर आसाम पर्यटन विभागानं संदर्भात जाहिरातबाजी देखील केली आहे.
 
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारच्या पर्यटन विभागाकडून संकेतस्थळावर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये "भारतातील सहावं ज्योतिर्लिंग असलेलं, कामरुप डाकिनी पर्वत, आसाम आपलं स्वागत आहे," असं म्हटलं आहे
 
दरम्यान, आसाम सरकारच्या या अजब दाव्यावर आता चौफेर टीका होताना दिसत आहे. यावर सरकारनं भूमिका जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
 
शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे म्हणाले, "प्रत्येक राज्यामध्ये असलेल्या मंदिराबाबत आम्हाला आदर आहे. मात्र उद्योगाप्रमाणे मंदिरे पण दुसरा राज्यामध्ये घेऊन जात आहेत का? असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्राला डिवचण्यासाठी वाद करू नका."
 
एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

Published By -Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जपानमध्ये भूकंपात फक्त 3 मृत्यू, मग, तुर्की-सीरियात हजारोंचा जीव का गेला?