Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भुजबळांनी तुरूंगाबाहेर येऊन बजावला मतदानाचा हक्क

भुजबळांनी तुरूंगाबाहेर येऊन बजावला  मतदानाचा हक्क
, सोमवार, 17 जुलै 2017 (16:36 IST)

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तुरूंगाबाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे ऑर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तर राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. या दोघांनाही पोलीस बंदोबस्तात तुरुंगाबाहेर आणण्यात आले. त्यानंतर मतदानासाठी त्यांना विधानसभेत नेण्यात आले. छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोन्ही नेत्यांचं स्वागत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. राष्ट्रवादीचे इतर नेतेही यावेळी हजर होते.

याआधी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोघांनीही पीएमएलए कोर्टाकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती केली होती. कोर्टानं ही विनंती मान्य करत या दोघांनाही परवानगी दिली होती. आता मतदानाचा हक्क बजावून झाल्यानंतर या दोघांनाही पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकचा गोळीबार, चिमुरड्यांचा मृत्यू, एक जवान शहीद