Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नितीन गडकरीं कडून मोठी घोषणा टोल प्लाझा मोफत होणार !

नितीन गडकरीं कडून मोठी घोषणा टोल प्लाझा मोफत होणार !
, गुरूवार, 18 मार्च 2021 (21:50 IST)
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीयांनी गुरुवारी टोल प्लाझा संदर्भात मोठी घोषणा केली. लोकसभेत नितीन गडकरी म्हणाले की, येत्या एक वर्षात देशातील सर्व टोल प्लाझा संपुष्टात येतील. तथापि, याचा अर्थ असा नाही की टोल भरावा लागणार नाही. आता वाहनांमध्ये जीपीएस सिस्टम (GPS System) बसविण्यात येणार आहे, ज्याच्या मदतीने टोल शुल्क(Free toll)  भरले जाऊ शकतील.
 
नितीन गडकरी काय म्हणाले?
गुरुवारी नितीन गडकरी म्हणाले की, पूर्वीच्या सरकारच्या काळात शहरी भागात अनेक ठिकाणी टोलनाके निर्माण करण्यात आले होते, ते चुकीचे व अन्यायकारक आहे.त्यांना काढून टाकण्याचे काम एका वर्षात पूर्ण करण्यात येईल. लोकसभेच्या प्रश्नकाळाच्या दरम्यान सदनाचे सभासद गुरजीत औजला, दीपक बैज आणि  कुंवर दानिशअली यांनी पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती त्यांच्या वतीने दिली. ते म्हणाले की  प्रथम शहरात बनविलेले टोल चुकीचे आणि अन्यायकारक आहे. एका वर्षाच्या आत हे टोल देखील संपुष्टात येतील. अशा प्रकाराच्या टोल मध्ये चोऱ्या होत होत्या.टोल प्लाझा जरी संपला तरी ही टोल भरावा लागणार. गडकरी म्हणाले. की 93 टक्के वाहने FASTag वापरून टोल भरतात.   

वाहनांमध्ये GPS सिस्टम बसविले जाणार 
केंद्रीय मंत्री म्हणाले की, आता वाहनां मध्ये जीपीएस सिस्टम बसविण्यात येणार आहे, ज्याच्या मदतीने टोल शुल्क भरता येईल आणि त्यानंतर अशा टोलची गरज शहरांमध्ये नसणार.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय सांगता,आता JioPages टीव्ही मध्ये देखील बघू शकतो