Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिहारमध्ये आरटीईमध्ये संशोधन, 5व्या आणि 8व्या वर्गात होईल वार्षिक परीक्षा

बिहारमध्ये आरटीईमध्ये संशोधन, 5व्या आणि 8व्या वर्गात होईल वार्षिक परीक्षा
, सोमवार, 4 मार्च 2019 (10:08 IST)
बिहारच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना आता पाचव्या आणि आठव्या वर्गाच्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी वार्षिक परीक्षा देणे आवश्यक आहे. तसेच अपयश येणार्‍या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात रोखण्यात येईल. याबद्दल शिक्षण विभागाने मुलांचे मोफत आणि अनिवार्य शिक्षण नियम 2011 मध्ये संशोधन केले आहे. 
 
आरटीई ऍक्ट 2009 अमलात आणल्यानंतर प्रावधान करण्यात आले आहे की 1 ते 8 या वर्गात कोणत्याही विद्यार्थी रोखण्यात येणार नाही. कोणीही कोणत्याही वर्गात पास-फेल ठरणार नाही, त्याऐवजी प्रोन्नत केले जाईल. यावर चर्चा झाल्यानंतर त्याच शैक्षणिक सत्रात केंद्र सरकारने आरटीई ऍक्टमध्ये बदल करताना दोन वर्गांत वार्षिक परीक्षा अनिवार्य केले आहे. सरकारच्या संशोधनाला आपल्या ऍक्टमध्ये बदल करून या सत्रातून अमलात आणण्यात आलेला बिहार हा पहिला राज्य बनला. बदल आल्यानंतर पाचवी आणि आठवीमध्ये परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत विद्यार्थी अपयशी झालेतर त्यांना आणखी एक संधी मिळेल. दोन महिन्यांच्या विशेष शिक्षणानंतर ते परीक्षेत बसतील. पास होणारे पुढील वर्गात, तर फेल होणारे त्याच वर्गात थांबतील. शाळेला लक्ष देणे आवश्यक आहे की अशा विद्यार्थ्यांमध्ये हीनभावना नाही आली पाहिजे. 
 
आता 5व्या वर्गात शिकत असणारे जवळ 26 लाख आणि 8 व्या वर्गात 20 लाख विद्यार्थ्यांना या वर्षाची वार्षिक परीक्षा देणे आवश्यक असेल. बदल केल्यानंतर, परीक्षा तारीख देखील बदलली आहे. बीईपीचे रविशंकर सिंह म्हणाले की पाचवी आणि आठवी च्या मुलांची वार्षिक परीक्षा 11 ते 17 मार्च दरम्यान होईल. या दोन्ही वर्गांव्यतिरिक्त उर्वरित वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन परीक्षा 25 ते 29 मार्च दरम्यान होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

26 मार्चपासून इंडिया ओपन, जगातील सर्वोत्तम खेळाडू होतील सहभागी