Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिहार: विषारी दारूने अनेकांचा मृत्यू

बिहार: विषारी दारूने अनेकांचा मृत्यू
, शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (10:58 IST)
बिहारमध्ये दारूबंदी आहे, मात्र तरीही विषारी दारूने येथे कहर केला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात बनावट दारू पिल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या बेतियामध्ये ३ नोव्हेंबरपासून बनावट दारू प्यायल्याने १३ जणांना जीव गमवावा लागला आहे. गोपालगंजमध्ये 2 नोव्हेंबरपासून अवघ्या 3 दिवसांत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मुझफ्फरपूरमध्ये गेल्या आठवड्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही ठिकाणी खळबळ उडाली आहे. एवढ्या लोकांचा एकत्रित मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोकाचे वातावरण आहे. पश्चिम चंपारणचे डीएम कुंदन कुमार म्हणाले की, जर एखाद्याची तब्येत बिघडत असेल तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुनीत राजकुमारच्या निधनानंतर नेत्रदान वाढले, तिघांची नेत्रदानासाठी आत्महत्या