Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिल गेट्‌स यांनी केले नरेंद्र मोदींचे कौतुक

बिल गेट्‌स यांनी केले नरेंद्र मोदींचे कौतुक
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स यांनी एकदा पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. त्यांनी एका ब्लॉगवर लिहिले की मागील 3 वर्षांपासून स्वच्छता आणि उघड्यावर शौच यावर मोदींद्वारे उचलले पाऊल कौतुक करण्यासारखे आहे. पंतप्रधान मोदींनी अश्या समस्येकडे लक्ष देऊन जागृती आण्याचा प्रयत्न केला ज्याबद्दल आम्ही विचार करणेही पसंत करत नाही.
मोदींनी लोकांच्या आरोग्याबद्दल ठळक टिप्पणी केली आहे ज्याचे परिणामही बघायला मिळत आहे असे म्हणत गेट्सने आठवण करवून दिली की स्वातंत्र्य दिनावर आपल्या पहिल्या भाषणातच मोदींनी याबद्दल आपले मत मांडले होते. गेट्स यांनी त्या भाषणाचे काही अंशही आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे.
 
गेट्स यांनी लिहिले की आम्ही 21 व्या शतकात राहत आहोत, आमच्या आई आणि बहिणी उघड्यावर शौचासाठी जाण्यास मजबूर आहे, काय आम्हाला हा त्रास कधी जाणवला? गावातील गरीब बायका शौच जाण्यासाठी अंधार होण्याची वाट बघतात. याने त्यांच्या शरीरावर काय परिणाम होत असेल, त्यांना आजार होण्याच धोका आहे. काय आम्ही आपल्या आई आणि बहिणींसाठी शौचालयांचा निर्माण करवू शकत नाही!
 
गेट्स यांनी म्हटले की आतापर्यंत इतर कोणत्याही मोठ्या पदावर असलेल्या नेत्याने या प्रकाराचा मुद्दा मांडलेला नाही. मोदींनी यावर केवळ भाषणच केले नाही तर त्यावर कामही केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता सिरी व्हॉट्सअॅपवर आलेले मेसेजही वाचणार